विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महानगर पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आज अंबादास दानवे हे पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर होते. महानगर पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर स्थायी समितीच्या हॉलमध्ये पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, महानगर पालिका प्रशासनाने हॉल चे कुलूपच उघडले नाही. दानवे यांना काही मिनिटे तसच थांबावं लागलं. कंटाळून त्यांना तिथून निघून जावं लागलं. यामुळे संतापलेल्या अंबादास दानवे यांनी आयुक्तांची मग्रुरी शिवसेना नीट करू शकते असा इशाराच त्यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची ‘वर्षा’वर भेट घेणारा हेमंत दाभेकर कोण?

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर होते. आकुर्डीत जनता दरबार हि घेतला. मग, महानगर पालिकेत त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मात्र, ठीक चार वाजता अंबादास दानवे हे पत्रकार परिषद घेणार होते. तो हॉलच महानगर पालिका प्रशासनाने उघडला नाही. यामुळं शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची धावपळ झाली. कंटाळून काही मिनिटांनी अंबादास दानवे आणि सचिन अहिर हे पालिकेतून खाली निघून आले. त्यांना पत्रकरांनी गाठून हा प्रश्न विचारल्यानंतर आधी प्रोटोकॉल चा भाग असल्याचं सांगत प्रकरण सावरून घेण्याचा प्रयत्न केला. नंतर मात्र त्यांनी आयुक्तांची ही मग्रुरी आणि मनमानी कारभार लक्षात येतो अस म्हणत शिवसेना नीट करेल असा थेट इशाराच आयुक्तांना दिला. तस ही आम्हाला दरवाजा तोडून बसण्याची सवय आहे असं सचिन अहिर म्हणाले. यामुळे महानगर पालिकेत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambadas danve expressed displeasure with pimpri chinchwad municipal commissioner shekhar singh kjp 91 zws