पुणे : ससून रुग्णालयाच्या आवारातून दुुचाकी लांबविणाऱ्या एका रुग्णवाहिका चालकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सतीश मारुती गंगावणे (वय ३३, रा. पिंपरी गुरव, ता. कर्जत जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गंगावणे खासगी रुग्णवाहिका चालक आहे. त्याने ससून रुग्णालयाच्या आवारातून दुचाकी चोरल्या होत्या. तो ससून रुग्णालयाच्या परिसरात थांबला असून त्याने दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. गंगावणेने चोरलेल्या दुचाकींची विक्री कर्जत परिसरात केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र गावडे, मोहन काळे, सुधीर घोटकुले, शंकर संपते, अमोल सरडे आदींनी ही कारवाई केली.

municipal hospital in Bhandup, maternity in lamps,
भांडुपमधील महापालिका रुग्णालयातील प्रसूती दिव्यांच्या प्रकाशातच, महापालिकेचा उच्च न्यायालयात दावा
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
ST Bus exempted, road tax, ST Bus toll booths,
पथकराच्या खर्चातून एसटीची सुटका : मुंबईतील पाच टोल नाक्यावरील पथकरातून एसटीला वगळले
Senior police inspector arrested while accepting a bribe of three and a half lakhs
पावती न देता दंडवसुली करणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा
thieves stole cash and liquor bottles worth rs 40920 from liquor shop in kondhwa area
आंबा बर्फी, सुकामेव्यानंतर आता मद्याच्या बाटल्या लंपास – कोंढवा परिसरातील मद्यालयात चोरी
death case of pregnant women and newborn child in bhandup Court orders JJ Hospital authorities to explain
गर्भवती, नवजात बालकाच्या मृत्युचे प्रकरण : जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठत्यांना उपस्थित राहून स्पष्टीकरण देण्याचे न्यायालयाचे आदेश
Shop fire Nashik, hospital safe Nashik, fire Nashik,
नाशिकमध्ये दुकानाला आग, वरच्या मजल्यावरील रुग्णालय सुरक्षित
Fraud with doctor by give lure of installing solar power system in hospital
पुणे : रुग्णालयात सौर उर्जा यंत्रणा बसविण्याच्या आमिषाने डॉक्टरची फसवणूक