पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ताब्यात असलेल्या समाविष्ट ३४ गावांधील सुविधा भूखंड (ॲमेनिटी स्पेस) आणि रस्ता रुंदीकरणाचे क्षेत्र महापालिकेला हस्तांतरित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे समाविष्ट गावांमध्ये सुविधा देणे महापालिकेला शक्य होणार असून, २ हेक्टर २ आर एवढी जागा महापालिकेला उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा >>> पुण्यात संपाचा असाही परिणाम! आधी अफवा नंतर पेट्रोल पंपांवर रांगा अन् सगळे सुरळीत

Financial crisis of MMRDA from urban development department Mumbai news
नगरविकास विभागाकडून एमएमआरडीएची आर्थिक कोंडी; मेट्रोचा निधी नागरी परिवहन निधीत वर्ग; प्रकल्पातील अडचणीत वाढ
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
BJP focuses on agriculture sector to reduce farmers anger print politics news
शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी भाजपचा कृषी क्षेत्रावर भर
Nine talukas of tobacco-free schools in nashik including Sinnar
जिल्ह्यात तंबाखूमुक्त शाळांचे नऊ तालुके, सिन्नरचाही समावेश
Polling stations in schools faced objections in Hingana assembly constituency Nagpur district
भाजप आमदाराच्या शाळेत मतदान केंद्र, राष्ट्रवादीचा आक्षेप…
Mumbai Municipal Corporation, posts Clerk Mumbai Municipal Corporation,
मुंबई महानगरपालिकेतील लिपिक पदाच्या १८०० जागांसाठी दोन लाख अर्ज
Increase in 11th seats in Eklavya residential schools nashik news
एकलव्य निवासी शाळांमध्ये अकरावीतील जागांमध्ये वाढ
Samruddhi Highway, MSRDC, Bhiwandi, Mumbai,
मुंबई : ‘समृद्धी’लगतचा विकास ‘एमएसआरडीसी’कडे, भिवंडीतील ४६ गावांसाठी विशेष प्राधिकरण म्हणून नियुक्ती

महापालिका हद्दीत नव्याने ३४ गावांचा काही वर्षांपूर्वी समावेश करण्यात आला आहे. समाविष्ट गावातील जागांचा ताबा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) होता. त्या अनुषंगाने, प्राधिकरणाचे जमीन आणि मालमत्ता विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभाग यांनी प्राधिकरणाचे उप अभियंता वसंत नाईक, महानगरपालिकेचे उप अभियंता यांचे नेतृत्वाखाली संयुक्त पथक स्थापन केले होते. मौजे सूस येथील ५ प्रकरणातील सुविधा क्षेत्र आणि रस्ता रुंदीकरणाच्या ठिकाणांची संयुक्त पाहणी करून ही जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामध्ये सुविधा क्षेत्र ६८८ चौ.मी. आणि रस्त्याखालील क्षेत्र ६३८८ चौ.मी. तसेच म्हाळुंगे येथील तीन प्रकरणातील रस्त्याखालील क्षेत्र १० हजार ९५७ चौ. मी. बावधुन बुद्रुक येथील एका प्रकरणातील १ हजार ८५२ चौ. मी. रस्ता रुंदीकरणासाठीचे क्षेत्र ३१४ चौ. मी असे एकूण २ हजार ५४० चौ. मी आणि रस्त्याखालील १७ हजार ६५० चौ. मी असे एकूण २ हेक्टर २ आर जागा महापालिकेच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली.

सुविधा क्षेत्राच्या जागांची माहिती

गावाचे नाव    रस्त्याचे चौ. मी. क्षेत्र     सुविधा भूखंड संख्या       सुविधा क्षेत्र          

सूस              ६३८७.९५                 १                     ६८८.२६ चौ. मी.

म्हाळुंगे           १०९५७.५७             —              —

बावधन बुद्रुक           ३१४              १           १८५१.७९ चौ. मी.

फुरसुंगी            २५०              १            ९८२.५० चौ. मी.

मांजरी बुद्रुक           १००             १           ४१६.२५ चौ. मी.

मुंढवा            १५३५.४३                १           ६०२.२५ चौ. मी.

उंड्री              ५८१.४७                  २            २२५१ चौ. मी.

किरकिटवाडी   ४८८७.७४                —             —

आंबेगाव खुर्द          ००००                १              ८४० चौ. मी.

आंबेगाव बुद्रुक      ४०४.७०              —               —

आवताडे-हांडेवाडी   ४३६०               —               —

लोहगाव                 ४०५३. ४४          ४             ३७९५ चौ. मी.

वाघोली               ३८७२८. ७६           २४              २०२१३७. ५३ चौ. मी.

एकूण                ५४९०१.५४              ३४             २११०२४. ५३ चौ. मी.