Uddhav Thackeray on Amit Shah: भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काही दिवसांपूर्वी पुण्यातील बालेवाडी येथे सभा झाली होती. या सभेत अमित शाह यांनी शिवसेना उबाठा गटावर टीका केली होती. उबाठा गटाने काँग्रेसच्या नादी लागू हिंदुत्व सोडलं, असे अमित शाह म्हणाले होते. आज शिवसेना उबाठा गटाची पुण्यात सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांना अहमद शाह अब्दालीची उपमा दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, काही दिवसांपूर्वी पुण्यात भाजपाचा एक कार्यक्रम झाला. इतिहासात आपण डोकावलं, तर शाहिस्तेखान जरा तरी हुशार होता, असं म्हणावं लागेल. त्याचं बोटावर निभावलं. तीन बोटं कापली गेल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात नाही आला. त्यातनं काही शहाणपण यांनी घेतले असते तर परत महाराष्ट्रात आले नसते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
shivsena thackeray groups protest march in Kalyan over minor girls murder case
कल्याणमध्ये बालिका हत्याप्रकरणी ठाकरे गटाचा निषेध मोर्चा
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
three KZF terrorist involved in Gurdaspur grenade attack killed
Punjab Grenade Attacks : पंजाबमध्ये ग्रेनेड हल्ला करणारे तीन दहशतवादी एन्काउंटरमध्ये ठार; यूपी आणि पंजाब पोलि‍सांची संयुक्त कारवाई
Image of Allu Arjun House
Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणाऱ्या सहा आरोपींना जामीन, हल्लेखोरांशी मुख्यमंत्र्यांचा संबंध असल्याचा आरोप
Sanjay Raut On MNS chief Raj Thackeray Uddhav Thackeray meet
Udhhav Thackeray-Raj Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार? भूमिका स्पष्ट करत राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह हे त्यांचे…”
Uddhav Thackeray Criticized Amit Shah and Modi
Uddhav Thackeray : “हिटलर आणि मुसोलिनीही भरघोस मतांनी…”; उद्धव ठाकरेंची मोदी-शाह यांच्यावर बोचरी टीका

हे वाचा >> Uddhav Thackeray: ‘मी ढेकणाला आव्हान देत नाही’, उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका; म्हणाले…

“पण ते (अमित शाह) परत का आले? तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या फटक्यांचे वळ कुणाकुणाच्या अंगावर उमटले. हे पाहण्यासाठी ते आले. अहमदशाह अब्दालीचा राजकीय वंशज हा पुण्यात आला होता. तो अहमद शाह होता आणि हे अमित शाह आहेत. अहमद शाहचा राजकीय वशंच इथे वळवळायला आला होता. नवाज शरीफचा केक खाणाऱ्यांकडून आता आम्ही हिंदुत्व शिकायचं का? शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे हे म्हणाले. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. शं‍कराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे विश्वासघातकी लोक हिंदू असू शकत नाही. तुम्ही आमच्याशी विश्वासघात केला”, असे टीकास्र उद्धव ठाकरेंनी सोडलं.

आम्ही काँग्रेसशी आघाडी केली तर हिंदू विरोधी होतो का? मग तुमचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी मुस्लीम लीगबरोबर मांडीला मांडी लावून का बसले होते? जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्याबरोबर सरकार स्थापन केले होते. आजही चंद्राबाबू नायडू यांच्याशी आघाडी केली. नायडू हे काय हिंदुत्ववादी आहेत का? नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? त्यांच्याकडे डोळेझाक करून आमच्यावर टीका करता, असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

यापुढे अहमद शाह अब्दालीच म्हणणार…

मी अमित शाहांना यापुढे अहमद शाह अब्दालीच म्हणणार. मला तुम्ही नकली संतान म्हणालात तेव्हा लाज नाही वाटली. मला तुम्ही औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणताना तुमची जीभ नाही अडखळत, मग तुम्ही अहमद शाह अब्दाली आहात, हे बोलायला मी का घाबरू? हा अहमद शाह अब्दाली पाहीजे की भगवा हातात घेतलेला शिवसैनिक पाहिजे? हे आता जनतेने ठरवावे, असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

लोकसभेत जेवढे वळ तुमच्यावर उठलेत. त्यापेक्षा अधिक वळ विधानसभेच्या निकालात उठतील. त्यानंतर तुमची वळवळ कायमची थांबलेली असेल. ज्याप्रकारे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात बांधली. त्याप्रमाणे भाजपाची कबर आपण महाराष्ट्रात बांधू, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Story img Loader