काश्मिरमध्ये शिक्षण, रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहे. काश्मिरच्या विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. काश्मिरमध्ये शांतता (अमन) प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी सांगितले. काश्मिरमध्ये हौतात्म्य पत्करलेल्या पोलिसांच्या मुलांशी शहा यांनी संवाद साधला. मुलांच्या विविध प्रश्नांना त्यांनी मोकळेपणे उत्तरे देऊन त्यांना आश्वस्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- अमित शाहांकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मोठं भाष्य, म्हणाले “या निकालाने…”

सेनापती बापट रस्त्यावरील एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात शहा यांनी काश्मिरी मुलांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सरहद संस्थेचे संजय नहार आदी या प्रसंगी उपस्थित होते. काश्मिरमध्ये बेरोजगारी आहे. आम्हाला राेजगाराची संधी उपलब्ध करुन दिल्यास आम्ही काश्मिरला परत जातो. काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित व्हायला पाहिजे, असे प्रश्न काश्मिरी मुलांनी या वेळी उपस्थित केले.

हेही वाचा- ४४० व्होल्टचा करंट देण्याच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्या चंद्रशेखर बावनकुळेंना…”

काश्मिरी नागरिक शांतताप्रेमी आहेत. आम्ही काश्मिरी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देत आहोत. काश्मिरच्या विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. लवकरच तुम्हाला बदल जाणवतील. काश्मिरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित होईल, असे शहा यांनी सांगितले. दु:ख, यातना भोगूनही काश्मिरी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून भारावलो. काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस, लष्कर प्रयत्न करत आहे. आम्ही काश्मिरी नागरिकांसोबत आहोत. सरहद सारख्या संस्था काश्मिरमध्ये काम करत आहेत, याचे कौतुक वाटते, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी काश्मिरमधील युवती शमिमा अख्तर हिने पसायदान सादर केले. सरहद संस्थेकडून पुणे जिल्ह्यातील गुंजवणी भागात वसतीगृह बांधण्यात आले आहे. १ जूनपासून काश्मिरी मुले तेथे वास्तव्यास जातील, असे संजय नहार यांनी सांगितले.