महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधत आढळराव हे रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप केला आहे. पाटील यांची स्थिती थ्री इडियटमधल्या त्या ‘ऑल इज वेल’ म्हणणाऱ्या व्यक्तीसारखी झाल्याचा टोला लगावला आहे. अमोल कोल्हे हे पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा – ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका

Eknath Shinde On Heena Gavit :
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा हिना गावितांना अप्रत्यक्ष इशारा; म्हणाले, “बंडखोरी…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
Ajit Pawar
Ajit Pawar : योगी आदित्यनाथांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’शी अजित पवार सहमत? म्हणाले, “तडजोडी…”
maharashtra assembly election 2024 mim imtiaz ialil vs bjp atul save aurangabad east assembly constituency
लक्षवेधी लढत : एक है तो सेफ है’ विरोधात ‘इत्तेहाद’!
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका

हेही वाचा – पुणे : आईच्या शस्त्रक्रियेसाठी शेजाऱ्याचे घर फोडले

महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघात नागरिक अडवणूक करत असल्याचा आरोप केला होता. यावर कोल्हे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधक स्वतःचे कार्यकर्ते पेरून ठेवून त्यांनाच प्रश्न विचारायचा आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करायचा, असा रडीचा डाव खेळत आहेत, असा टोला त्यांनी शिवाजी आढळराव पाटील यांना लगावला. पुढे ते म्हणाले, झोपलेल्याला उठवता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही. आढळराव यांनी त्यांच्या डोळ्यांवर विरोधाची कातडी पांघरली असल्याने त्यांना शिरूर लोकसभेतील विकास दिसत नाही. थ्री इडियट चित्रपटात एक प्रसंग होता. सर्व चांगलं म्हणण्यासाठी स्वतःलाच ऑल इज वेल म्हणावं लागायचं. हा त्यातीलच प्रकार असल्याचं म्हणत त्यांनी आढळराव यांची खिल्ली उडवली आहे.