पिंपरी : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडतील, असे विधान करणारे राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचे तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. कोल्हे यांची मंगळवारी मुलाखत पार पडली. पिंपरी- चिंचवडमधील दिशा सोशल फाउंडेशनने खासदार अमोल कोल्हे यांची मुलाखत आयोजित केली होती.

मुलाखतीत अमोल कोल्हेंनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यामुळेच मी शिरूर लोकसभेचा खासदार झालो असल्याचा खुलासा कोल्हेंनी केला. तुम्ही भाजपामध्ये जाणार का? या प्रश्नाचेही उत्तर त्यांनी दिले.

हेही वाचा – इंदापूरात सर्वाधिक ९०५१ हेक्टर फळबाग क्षेत्र, डाळिंब उत्पादनाला पसंती

तुम्ही भाजपामध्ये जाणार का? हा प्रश्न खासदार अमोल कोल्हेंना विचारताच काय करू असे त्यांनी प्रेक्षकांना विचारले, मग मिश्किल उत्तर देत “मतदारांमध्ये एक वाक्यता नाही, मग कशाला घाई करायची”, असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेली. अमोल कोल्हे म्हणाले, शिरूर लोकसभा मतदारसंघाचा मी खासदार आहे. यात अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. एकीकडे त्यांचा मुलगा पार्थ पवार निवडणूक लढवत होता. शिरूर लोकसभा मी लढवत होतो. असे असताना मावळ आणि शिरूर लोकसभा अजित पवार यांनी हाताळली, स्वतः जातीने लक्ष घातले. अन्यथा २२ दिवसांत लोकसभेची निवडणूक चेहऱ्यावर जिंकता येत नाही. त्यासाठी अजित पवारांचा हात लागतो. तर आणि तरच निवडणूक जिंकता येते, असे म्हणत कोल्हेंनी अजित पवारांचे तोंडभरून कौतुक केले.

Story img Loader