शहरात नव्याने आलेल्या पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी सायंकाळी दिले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी अमोल झेंडे, वाहतूक शाखेच्या उपायुक्तपदी विजय मगर यांची नियुक्ती करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पिंपरीः जलतरण तलावात बेकायदेशीर क्रिकेट अकादमी?;चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

शहरात नव्याने आलेल्या सात पोलीस उपायुक्तांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. दोन पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. संदीपसिंह गिल यांची परिमंडळ एकच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. स्मार्तना पाटील यांची परिमंडळ दोनच्या उपायुक्तपदी, सुहेल शर्मा यांची परिमंडळ तीनच्या उपायुक्तपदी, शशिकांत बोराटे यांची परिमंडळ चारच्या उपायुक्तपदी, विक्रम देशमुख यांची परिमंडळ पाचच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. विजयकुमार मगर यांची वाहतूक शाखेच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा >>>पुणे: एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महिला पोलीस अधिकारी निलंबित

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांची आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांची पोलीस मुख्यालयात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.