अमरामवती येथील कारागृह अधिकाऱ्याच्या मुलावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा खून करणाऱ्या आरोपींना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांना ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे घडली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

वर्षा सुरेश कमने उर्फ महेक अरमान शेख (वय २०, रा. काळे बोराटेनगर, हडपसर), अरबाज उर्फ अल्लाउद्दीन शेख (वय २१), भैय्या उर्फ प्रदीप अंकुश चव्हाण (वय २०), आकाश जगन्नाथ देवकाते (वय २०, सर्व रा. माढा, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गिरीधर उत्रेश्‍वर गायकवाड (वय २१, रा. गोपळपट्टी पार्क साई टॉवर, मांजरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गिरीधरचा भाऊ निखिलकुमार गायकवाड (वय २७) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

गिरीधरचे वडील उत्तरेश्‍वर गायकवाड हे अमरावती मध्यवर्ती कारागृहात कारागृह अधिकारी म्हणून काम करीत आहेत. गिरीधर मंगळवारी रात्री दहा वाजता त्याच्या घरी बसला होता. त्यावेळी त्याला एक फोन आल्यानंतर तो घराबाहेर जाऊ लागला. त्यावेळी त्यास त्याच्या भावाने विचारणा केल्यानंतर तो, मैत्रीणीने बोलाविले असल्याने तिला भेटून येतो असे सांगून गेला. तो अर्धा तासानंतरही घरी न परतल्याने त्याच्या आई, भावाला काळजी वाटू लागली. त्याचवेळी त्याच्या वडीलांनी दोघांना गिरीधरचा खून झाला असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याचे कुटुंबीय व वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, अन्य पोलिस अधिकारी घटनास्थळी पोचले. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला होता.

तरुणी व गिरीधर एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यावेळी तरुणीचा तिच्याच वर्गातील एका तरुणासमवेत प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर तरुणी व गिरीधर यांच्यात जवळीक वाढली होती. याच कारणावरून तरुणी व तिच्या पतीची भांडणे होत होती. दरम्यान, मंगळवारी रात्री तरुणीच्या पतीने मद्यपान केल्यानंतर गिरीधरला बोलावून घेण्यास सांगितले. त्यानंतर हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे गिरिधर आल्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला.