पुणे : अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, कुलसचिवांची निवड करण्यात आली आहे. त्यात डॉ. अविनाश आवलगावकर यांची पहिले कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली. एक वर्षाच्या कालावधीसाठी किंवा कुलपतींद्वारे कुलगुरूंची नियमित नियुक्ती होईपर्यंत जे आधी होईल तोपर्यंत डॉ. आवलगावकर यांची नियुक्ती राहणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या बाबतचा शासन आदेश प्रसिद्ध केला. मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिद्धपूर येथे मराठी भाषेचे विद्यापीठ उभारण्याची घोषणा केली होती. विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भात साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आता पहिले कुलगुरू म्हणून डॉ. अविनाश आवलगावकर यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. आवलगावकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख आहेत. त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. विद्यापीठाचे पहिले कुलसचिव म्हणून उच्च शिक्षण विभागाच्या अमरावती विभागाचे सहसंचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
expert answer on career advice questions career advice tips from expert
करीअर मंत्र
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : खंक तिजोरी ओरबाडण्याचा कार्यक्रम
expert answer on career advice questions career advice tips
कराअर मंत्र
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत

हेही वाचा : राज्यात पावसाची अल्प विश्रांती ? जाणून घ्या हवामान विषयक स्थिती काय ?

निवडीबाबत डॉ. आवलगावकर म्हणाले, की मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदा मान मिळाल्याचा आनंद आहे. आता विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद, अभ्यास मंडळे, अभ्यासक्रम निर्मिती अशा प्रक्रिया पूर्ण करण्याला प्राधान्य देणार आहे. त्यानंतर विद्यापीठाचे अभ्यासक्रम सुरू केले जातील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आंतरविद्याशाखीय, रोजगारक्षम अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात येणार आहे.