“वाइन ही दारू असून सुपर मार्केटमध्ये ठेवण्याची गरज नाही. तिथं लहान मूल, महिला जातात. दुकानात वाइनला परवाना देऊन हे सरकार काही लोकांचा फायदा करत आहे. नागपूरमध्ये सुपर मार्केट असोसिएशनने वाइन ठेवणार नाही,” असं सांगत अमृता फडणवीस यांनी वाइनवरून महाविकास आघाडीला घेरलं आहे. विद्यार्थी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे. अन्यथा आजची वेळ विद्यार्थ्यांवर आली नसती, असं देखील त्यांनी नमूद केलं. अमृता फडणवीस लोणावळा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
अमृता फडणवीस म्हणाल्या, “विद्यार्थी, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न राज्यसरकार दुर्लक्षित करत आहे. काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी हे सरकार झटत आहे. आजची परिस्थिती विद्यार्थ्यांवर यायला नको होती. दुकानात वाइनला परवाना देऊन शेतकऱ्यांच्या नावाने काही लोकांचा फायदा केला जातोय. हे अयोग्य आहे. नागपूर सारख्या शहरात सुपर मार्केट असोसिएशन वाइन ठेवणार नाही असं म्हणत आहे.”
हेही वाचा : ‘नन्हे पटोले’ म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांबद्दल विचारलं असता नाना पटोले म्हणाले, “त्या आमच्या…”
“आघाडी सरकारमधील अर्ध्या नेत्यांना माहिती नसतं नेमकं की…”
“जे जागरूक नागरिक आहेत ते यापासून लांब राहतील. शेवटी वाइन ही दारूच आहे. सुपर मार्केटमध्ये लहान मूलं, महिला येतात. तिथं वाइनची गरज नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामधील अर्ध्या नेत्यांना माहिती नसतं नेमकं की महाराष्ट्रात काय सुरू आहे,” असं म्हणत अमृता फडणवीसांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.