शनिवारी पहाटे राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं अपेक्षेप्रमाणे यश संपादन केलं आहे. भाजपाचे तिन्ही उमेदवार निवडून आले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या विजयाचं श्रेय दिलं जात आहे. राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपाच्या विजयाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, “हो, मला नक्कीच खूप आनंद झाला आहे. “अब देवेंद्र अकेला नही है, ना कभी था, उनके साथ पुरी कायनात है” अशा शब्दांत त्यांनी आपल्या पतीचं कौतुक केलं आहे. “जो विकासाचं राजकारण करेन तोच दुनियात पुढे जाईल, टोमणेबाजीचं राजकारण करणारे मागे राहतील,” असंही त्या म्हणाल्या.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

भाजपानं रडीचा डाव खेळला यावरुन झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “जी लोक सोबत आली आहेत, ती प्रेमाने सोबत आली आहेत. सरकार कसं चालतं हे त्यांना कळालं आहे. भाजपा जे काही करत आहे, ते कर्तुत्वाच्या जोरावर करत आहे. रडीचा डाव खेळण्यासाठी ते महाविकास आघाडी नाही. भाजपा भाजपा आहे. ती कर्तुत्ववाचा डाव खेळते.” यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत देखील भाष्य केलं आहे. राज्यसभा निवडणुकीत आपला विजय झाल्याने विधान परिषदेतही विजय मिळेल याच काहीच दुमत नाही, असं त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या प्रजेसाठी किती योग्य आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी कोणी काही बोलत नव्हतं. पण आता प्रत्येक नागरिक बोलत आहे. त्यामुळे आता मला बोलायची गरज नाही. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस किंग मेकर ठरले आहेत. याबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली. यामध्ये विजयी झालेले पियुष गोयल, धनंजय महाडिक आणि अनिल बोंडे या सर्वांना शुभेच्छा देतो. हा विजय खूपच सुंदर आहे. सत्याचा विजय झालेला आहे. सत्याच्या बाजूने सगळेजण आहेत, याचा मला आनंद आहे.

Story img Loader