उर्फी जावेद हिच्या पेहेरावामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यावरून आमने सामने आल्या असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांनी उर्फीला सल्ला दिला आहे.
हेही वाचा- “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू”, उर्फीने ट्वीट करत चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं
सार्वजनिक ठिकाणी जाताना संस्कृती जपली पाहिजे. तुमचे व्यावसायिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य वेगळे असते, असे अमृता म्हणाल्या.
पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या अमृता यांनी माध्यमांशी बोलताना हा सल्ला दिला. महिलाच महिलांना मागे ओढतात. महिलाबाबत घाणेरडे बोलणे थांबवले पाहीजे, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा- “नंगानाच आणि फॅशन…”, उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ पुन्हा संतापल्या
पंजाबी गाणे आवडले म्हणून ते गाणे केले. भजन केले तरी ट्रोल होते. ट्रोल होण्याची आता सवय झाली आहे. मला त्याने मला फरक पडत नाही. लोकांना गाणे आवडले आणि त्यांनी स्वीकारले आहे. या गाण्यावर रिल्स होत आहे. कोणीही काही बोलले तरी मी माझे काम करत राहीन असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक विषयावर लोकांचे विचार असतात,तुम्ही जे आहात ते तुम्ही आहात, दबून नका जाऊ, पण कुठे कसे वागायचे याचे भान ठेवा असेही त्यांनी सांगितले.