पिंपरी- चिंचवडमध्ये शाळकरी मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अथर्व रवींद्र आळणे (वय-११) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अथर्वची आई त्याला स्कुटीवरून शाळेत घेऊन जात होती. त्यावेळेस चारचाकीचा धक्का लागला. या धक्क्यामुळे मुलगा थेट मालवाहू ट्रक खाली सापडला. त्यामुळे यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, आई किरकोळ जखमी झाली आहे. रक्ताने माखलेल्या मुलाला पाहून आई हर्षदा ह्यांनी हंबरडा फोडला. ह्या घटनेमुळं आळणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “माझी बायको होशील का?” इन्स्टाग्राम स्टेटस ठेवणाऱ्या १४ वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल, पुण्यातील धक्कादायक घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेला अथर्व हा चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावी (ब) मध्ये शिकत होता. आज सकाळी साडेसात च्या सुमारास हर्षदा, अथर्वला घेऊन स्कुटीने शाळेत सोडवण्यासाठी जात होत्या. जुन्या आरटीओ जवळ शाहूनगरच्या कॉर्नरला भरधाव स्कुटीला चारचाकीने धक्का दिला. स्कुटीवरून अथर्व मालवाहू भरधाव ट्रकच्या खाली सापडला तर हर्षदा दुसऱ्या बाजूला पडल्या. त्या किरकोळ जखमी आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातात अथर्वचा जागीच मृत्यू झाला असून काही फूट त्याला ट्रकने फरफट नेले. आपल्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याच पाहून हर्षदा ह्यांनी हंबरडा फोडला. जीवाच्या आकांताने त्या मोठं- मोठ्याने रडत होत्या. अथर्व असा अचानक सोडून जाईल अशी पुसटशी कल्पना देखील हर्षदा ह्यांना नसेल. ट्रकचालक आणि चारचाकी चालकाला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An 11 year old school boy died in an accident in pimpri chichwad kjp dpj