पुणे : बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने स्वतःचे, तसेच फरार आरोपीचे खोटे नाव सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपी शोएब ऊर्फ अख्तर बाबू शेख याच्या वडिलांचे नाव जमाल लखपती असे असून, त्याने खोटे नाव सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने फरार साथीदाराचे नाव बाप्या ऊर्फ सोमनाथ यादव असे असल्याचे सांगितले. तपासात त्याचे मूळ नाव बाप्या ऊर्फ सूरज दशरथ गोसावी असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. आरोपी दिशाभूल करत असल्याचे लक्षात आल्यानंतर येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी शोएब ऊर्फ अख्तर बाबू शेख (वय २७, रा. आदर्शनगर, मंतरवाडी, उरुळी देवाची) आणि चंद्रकुमार रविप्रसाद कनोजिया (वय २०, रा. होलेवस्ती, उंड्री) यांना पोलिसांनी सोमवारी (४ नाेव्हेंबर) रात्री ताब्यात घेतले आहे. दोघांना मंगळवारी (५ नोव्हेंबर) वानवडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून आरोपींची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

Ashwini Jagtap statement during Devendra Fadnavis meeting in Kalewadi for Shankar Jagtap campaign
चिंचवड: वाघ गेला, ही वाघीण पिल्लांना एकटं पडू देणार नाही; आमदार आश्विनी जगताप कुणाला उद्देशून म्हणाल्या?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
Devendra Fadnavis criticizes Mahavikas Aghadi on Ladaki Bahin Yojana Pune news
महाविकास आघाडीच्या सावत्र भावांचा बहिणींच्या पंधराशे रुपयांवर डोळा; देवेंद्र फडणवीस यांची टीका
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”

हेही वाचा >>>‘महाराष्ट्रवादी घोषणापत्रा’तून बारामतीसाठी आश्वासनांची खैरात

त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी आरोपीना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. या गुन्ह्याचा तपास संवेदनशील आहे. आरोपींची पोलीस कोठडी मिळवून सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील डाॅ. आम्रपाली कस्तुरे यांनी केला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शुक्रवारपर्यंत (८ नाेव्हेंबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपींची समोरासमोर चौकशी करून त्यांनी गुन्हा कशा प्रकारे केला आहे, यादृष्टीने तपास करण्यात येणार आहे. आरोपींनी अशा पद्धतीचे गुन्हे पुणे जिल्ह्यात केल्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

तपासासाठी पोलिसांचे पथक आरोपीच्या गावी

बोपदेव घाट सामुहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अख्तर शेखचे आधारकार्ड आणि जन्मदाखल्याबाबतची चौकशी करण्यासाठी पोलीस त्याला घेऊन मूळगावी लातूर आणि नागपूर येथे जाणार आहेत. फरार आरोपी बाप्या उर्फ सुरेश गोसावी याची माहिती आरोपींना आहे. गुन्हा केल्यानंतर तिघे कसे पसार झाले, ते कोठे गेले ? यादृष्टीने तपास करण्यात येणार आहे. आरोपी शेख आणि कनोजिया यांना तेथे नेण्यात येणार आहे. साक्षीदारांच्या समक्ष त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

Story img Loader