शाळकरी मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना वारजे भागात घडली. मुलीने प्रसंगावधान राखून पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला धक्का देऊन पळ काढला.या प्रकरणी वारजे पोलिसांनी संजीप राय याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अकरा वर्षीय मुलगी एका शाळेत आहे. आरोपी राय शाळेसमोर असलेल्या एका चहा विक्री दुकानात काम करतो. शाळा सकाळी साडेसातला भरते. मुलगी बसमधून शाळेत येते. शाळा सुरू होण्यापूर्वी मुलगी शाळेतील सुरक्षारक्षकाजवळ थांबते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरक्षारक्षक चहा पिण्यासाठी गेला. आरोपी राय मुलीजवळ आला. चहा प्यायला चल, असे सांगून त्याने मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा केला. मुलीने प्रसंगावधान राखून आरोपीचा हात झटकला. चहा पिऊन शाळेत निघालेल्या सुरक्षारक्षकाने आणि एका दुचाकीस्वाराने हा प्रकार पाहिला. दुचाकीस्वाराने रायला फटाकावले. आरोपी तेथून पसार झाला. मुलगी शाळेत परतली. तिने वर्गशिक्षकांना या घटनेची माहिती दिली. वर्गशिक्षिकेने मुलीच्या आईला माहिती दिली. मुलीच्या आईने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An attempt to kidnap a schoolgirl failed in pune print news tmb 01
Show comments