पुणे : आठ वर्षांच्या मुलाला धमकावून त्याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी तिघांना अटक केली. या प्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष उर्फ पक्या प्रकाश शिंदे (वय २१), हेमंत उर्फ हेम्या महेश माळवे (वय १९), किरण सुरेश सावंत (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित मुलाच्या वडिलांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आणि आरोपी एकाच भागात राहायला आहेत. पीडित मुलाला अश्लील ध्वनिचित्रफीत दाखवून तिघांनी मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. आरोपी किरण सावंत याने मोबाईलवर चित्रीकरण केले. त्यानंतर अल्पवयीन मुलाला धमकावून ध्वनिचित्रफीत नातेवाईकांना दाखविण्याची धमकी देऊन त्याच्यावर दोन महिने अत्याचार करण्यात आले.
हेही वाचा – पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दीनिमित्त मुंबईमध्ये दोन कार्यक्रमांची पर्वणी
हेही वाचा – पुण्यात ‘ईडी’कडून नऊ ठिकाणी छापे; व्यावसायिकांच्या निवासस्थानी, कार्यालयात कारवाई
या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास जीवे मारून टाकू, अशी धमकी दिली. घाबरलेल्या मुलाने याबाबतची माहिती वडिलांना दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली.