सातव्या दिवशी विसर्जनाची परंपरा असलेल्या सांगवीसह लगतच्या परिसरातील नागरिकांनी मंगळवारी (६ सप्टेंबर) गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. सकाळच्या सत्रात घरगुती गणपतींचे तर संध्याकाळनंतर मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

हेही वाचा >>> पुणे : उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पोराची काळजी घ्यावी – किरीट सोमय्या

पुण्यातील गणेशोत्सव सोहळ्याचा आनंद घेता यावा, या हेतूने पुण्याच्या हद्दीला खेटून असलेल्या सांगवीत सातव्या दिवशी विसर्जनाची परंपरा आहे. पालिकेने सांगवीतील दोन घाटांवर विसर्जनाची सर्व व्यवस्था केली होती. सकाळपासून विसर्जनासाठी रीघ लागली होती. दुपारपर्यंत घरगुती गणपतींचे विसर्जन झाले. तर, संध्याकाळी पाचनंतर मंडळांचे गणपती रस्त्यावर आले. रात्री उशिरापर्यंत मंडळांच्या मिरवणुका सुरू होत्या. मंडळांच्या मिरवणुकीतील आकर्षक रथ तसेच विविध पथके नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.

करोनामुळे गेली दोन वर्षे अतिशय साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा लागला. यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशभक्तांमध्ये अधिक उत्साह होता, त्याचा प्रत्यय विसर्जन मिरवणुकीतही आला. खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Story img Loader