पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील एका कर्मचाऱ्याला गुणपत्रिका देण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांकडून पैसे घेत असताना पकडल्याचा दावा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची अशी मागणी संघटनेने कुलगुरूंकडे केली.
गुणपत्रिका देण्यासाठी तीन हजार रुपये घेतल्याचा आरोप कला शाखेत पदवीचे शिक्षण घेणाऱ्या प्रथम भंडारी या विद्यार्थ्याने केला. त्यानंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला. तसेच संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी कुलगुरूंकडे केली. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अभाविपचे प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला आहे.
दरम्यान, याबाबतची चित्रफित समाजमाध्यमात पसरली असून, विद्यापीठातील कारभार समोर आला आहे.