लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे चारशे कोटींचा खर्च अपेक्षित असून स्टेडियम उभारण्याच्या कामासाठी सल्लागार नेमण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
The decision regarding the permission of the meeting at Shivaji Park Maidan is now with the Urban Development Department mumbai news
शिवाजी पार्क मैदानवरील सभेच्या परवानगीचा निर्णय आता नगरविकास विभागाकडे
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक

मोशीतील प्रभाग क्रमांक तीन येथील आरक्षण क्र.१/२०४ येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणे. या कामासाठी सन २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात चारशे कोटी रूपयांस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने स्टेडियम उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी सल्लागार नेमण्यासाठी दरपत्रक मागविण्यात आले होते.

हेही वाचा… लोणावळ्याच्या जंगलात ट्रेकिंग करतांना दाट धुके आणि मुसळधार पावसामुळे हरवलेल्या चार तरुणांना साडेतीन तासानंतर शोधण्यात यश

यामध्ये ओम टेक्‍नॉलिक्‍स यांनी सर्वात लघुतम असा १.९९ (निविदा पूर्व १.९८ टक्के तर निविदा पश्‍चात ०.१ टक्के) दर सादर केला आहे. त्यामुळे त्यांना सल्लागार म्हणून नियुक्ती देण्यास आयुक्त सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे. या कामाची निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर ओम टेक्‍नॉलिक्‍स यांना शासनाच्या निर्णयानुसार निविदा पूर्व ०.५० टक्के तर निविदा पश्‍चात १.४९ टक्के असे १.९९ टक्के इतकी फी टप्या-टप्याने अदा करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील तिसरे स्टेडियम

पुण्यात पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम तर गहुंजे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिशएनचे स्टेडियम आहे. पुण्यातील स्टेडियममध्ये काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होत होते. मात्र, गहुंजे येथे स्टेडियम झाल्यापासून पुण्यात क्रिकेट सामने होणे बंद झाले आहे. तर गहुंजे स्टेडियमच्या धर्तीवरच मोशीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्याचे नियोजन आहे. मोशीत क्रिकेट स्टेडियम झाल्यास पुणे जिल्ह्यात तीन स्टेडियम होतील.

मोशीत क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी सल्लागार नेमण्यात आला असून अंदाजे चारशे कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आल आहे. सल्लागार डिजाइन, अंदाजपत्रक (एस्टीमेट) तयार करणार आहे. त्यानंतर रक्कम अंतिम होईल. स्टेडियम बीओटी, पीपीई, खासगी की पालिकेच्या निधीतून करायचे हे अद्याप निश्‍चित झालेले नाही. – मकरंद निकम; शहर अभियंता; पिंपरी-चिंचवड महापालिका