पुणे : चाकणमध्ये शिवसेना भवनाच्या समोरील रस्त्यावर सराईत गुन्हेगाराचा १३ जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. मोन्या उर्फ मोनेश संजय घोगरे असे खुन झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याची एक महिन्यांपूर्वी तडीपारी संपली होती अशी माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे. मोन्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी चेतन मस्के, चंदर उर्फ चंद्रकांत कुऱ्हाडे या दोघांना अटक केली असून मुख्य सूत्रधार शुभम मस्के हा फरार आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुभम मस्के, चेतन मस्के, चंदर उर्फ चंद्रकांत कुऱ्हाडे, रोहित कुऱ्हाडे, अर्जुन कुऱ्हाडे, हिऱ्या उर्फ आकाश चौधरी, किशोर धिवर, प्रणव जधाव, अर्जुन कुऱ्हाडे इतर चार जण असे एकूण १३ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल विश्वनाथ लाटूकर वय-२४ याने याबाबत तक्रार दिली आहे. 

हेही वाचा: शौचालयांची दुरावस्था: क्षेत्रीय कार्यालयाबाहेर शौचालयास बसून नागरिकांचे प्रतिकात्मक आंदोलन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार मोन्या हा एक महिन्यापासून चाकण परिसरात दाखल झाला होता. मोन्या आणि अमोल हे दोघे चाकणच्या शिवसेना भवनासमोरील रस्त्यावरून जात होते तेव्हा, दुचाकी आणि स्कुटी वरून आलेल्या आरोपींनी त्यांची वाट अडवली. मुख्य सूत्रधार शुभमने धमकी देत तुम्हाला खूप माज आला आहे. तुमची विकेटच टाकतो असे म्हणून टोळक्याने कोयत्याने वार केले. यात, गंभीर जखमी होऊन मोन्याचा मृत्यू झाला तर अमोल हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दोन जणांना चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिस आयुक्तालयाची सूत्रे हातात घेतल्यानंतर शहरातील गुन्हेगारी कमी होईल असे वाटले होते. पण प्रत्येक्षात गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An murder due to animosity in chakan police arrested two persons murder crime pcmc pune tmb 01 kjp