पुणे : देशातील प्रमुख महानगरांमध्ये सदनिकांचा सरासरी आकार गेल्या वर्षी सुमारे ११ टक्क्यांनी वाढला आहे. दिल्लीमध्ये सदनिकांचा सरासरी आकार सर्वाधिक ३७ टक्क्यांनी वाढला असून, पुण्यात ११ टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, मुंबई आणि कोलकत्यात सदनिकांच्या सरासरी आकारात गेल्या वर्षी घट नोंदविण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देशातील प्रमुख महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा २०२३ चा अहवाल अनारॉक ग्रुपने जाहीर केला आहे. त्यात मुंबई, पुण्यासह दिल्ली, कोलकता, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद यांचा समावेश आहे. या अहवालानुसार, दिल्लीत सदनिकांचा सरासरी आकार मागील वर्षात ३७ टक्क्यांनी वाढला. दिल्लीत सदनिकांचा सरासरी आकार १ हजार ३७५ चौरस फुटांवरून १ हजार ८९० चौरस फुटांवर गेला आहे. त्याखालोखाल हैदराबादमध्ये सदनिकांचा सरासरी आकार ३० टक्क्यांनी वाढून २ हजार ३०० चौरस फुटांवर पोहोचला आहे.

हेही वाचा >>>तूर झाली दहा हजारी; काय आहे कारण जाणून घ्या…

बंगळुरूमध्ये सदनिकांचा सरासरी आकार मागील वर्षी २६ टक्क्यांनी वाढून १ हजार ४८४ चौरस फुटांवर गेला आहे. याचवेळी पुण्यात सदनिकांचा सरासरी आकार ११ टक्क्यांनी वाढला आहे. पुण्यात सदनिकांचा सरासरी आकार ९८० चौरस फुटांवरून १ हजार ८६ चौरस फुटांवर पोहोचला आहे. चेन्नईत सदनिकांचा सरासरी आकार ५ टक्क्यांनी वाढून १ हजार २६० चौरस फुटांवर गेला आहे.

हेही वाचा >>>“सर्वोच्च न्यायालयातील एक तृतीयांश न्यायाधीश चांगले, इतर…”, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचा आरोप

मुंबई आणि कोलकत्यात सदनिकांचा सरासरी आकार मागील वर्षी घटला आहे. मुंबईत सदनिकांचा सरासरी आकार ५ टक्क्यांनी घटला आहे. मागील वर्षी सदनिकांचा आकार ८४० चौरस फुटांवरून ७९४ चौरस फुटांवर घसरला. याचबरोबर कोलकत्यात सदनिकांचा आकार २ टक्क्याने कमी होऊन १ हजार १२४ चौरस फुटांवर घसरला आहे.

प्रमुख महानगरांमध्ये २०२३ मध्ये आलिशान घरांची विक्री वाढल्याचे दिसून आले. मागील वर्षी नव्याने सुरू झालेल्या गृह प्रकल्पांमध्ये १ लाखांहून अधिक आलिशान घरे होती. करोना संकटानंतर मोठ्या घरांना मागणी वाढली. ती अद्यापही कायम असल्याचे निदर्शनास आले आहे. अनुज पुरी, अध्यक्ष, अनारॉक ग्रुप

२०२३ मध्ये सदनिकांचा सरासरी आकार (चौरस फुटांमध्ये)

– मुंबई – ७९४

पुणे – १,०८६

– दिल्ली – १,८९०

– हैदराबाद – २,३००

– बंगळुरू – १,४८४

– चेन्नई – १,२६०

– कोलकाता – १,१२४