दिवाळीत सासूरवाडीत मुक्कामी आलेल्या चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून दुचाकी आणि मोबाइल संच जप्त करण्यात आला.
इरफान बबलू शिया (वय २२, मूळ रा. गुंटकल, आंध्रप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शिवाजीनगर परिसरात शिया याने एकाला लुटले होते. शिया याची सासूरवाडी वाकडेवाडी परिसरातील इराणी वस्तीत आहे. तो दिवाळीत सासूरवाडीत मुक्कामी येणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील हवालदार बशीर सय्यद यांना मिळाली.

हेही वाचा >>>पुणे : घरात डोकावून पाहिल्याने जाब विचारणाऱ्या एकाला मारहाण

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. शिया याच्याकडून दुचाकी आणि चोरलेला मोबाइल संच जप्त करण्यात आला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, गणपत वाळकोळी, बशीर सय्यद, रणजीत फडतरे, रुपेश वाघमारे, अविनाश चलवादी, तुकाराम म्हस्के आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader