पुणे : पुण्यातील वाघोली रोडवर हॉटेलचे बील देण्यावरून मित्राच्या कानाखाली मारली. तो राग मनात धरून कानाखाली मारणाऱ्या मित्राच्या अंगावर कंटेनर घालून चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. परमेश्वर बालाजी देवराये वय वय ३५ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राम दत्ता पुरी वय २५ असे आरोपीचे नाव आहे. या आरोपीला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील कटकेवाडी येथील एका हॉटेलमध्ये परमेश्वर बालाजी देवराये आणि राम दत्ता पुरी हे जेवण करण्यास गेले होते. जेवण झाल्यानंतर बील देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्या वादादरम्यान परमेश्वर देवराये याने राम पुरी च्या कानाखाली मारली. हा राग मनात धरून हॉटेलच्या बाहेर आल्यावर राम पुरीने परमेश्वर देवराये यांच्या अंगावर कंटेनर घातला. या घटनेमध्ये परमेश्वर देवराये यांचा जागीच मृत्यू झाला. तर राम पुरी या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आणखी वेगळ काही कारण होते का? याबाबत आरोपींकडे चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात आले.