पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने १ ते ५ ऑगस्ट दरम्यान लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून यानिमित्ताने अण्णा भाऊंच्या नावाने दिला जाणारा कलारत्न पुरस्कार लोककलावंत शाहीर नामदेव वैरागर यांना तर प्रल्हाद सुधारे व भाऊसाहेब अडागळे यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
महापौर मोहिनी लांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पहिल्या दिवशी निगडी येथील अण्णा भाऊंच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्याच ठिकाणी एड्स व क्षयरोगावर आधारित पोस्टरचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. याशिवाय, ‘शाहिरी जलसा’, ‘बँड स्पर्धा’, ‘पुणेरी कलारंग’, ‘जागतिकीकरण व कामगार चळवळी’ वर आधारित परिसंवाद, ‘लग्नाची बेडी’ हे नाटक, ‘बहुजनांची दशा व दिशा’ या विषयावर चर्चासत्र, ‘दौलत महाराष्ट्राची’, ‘सामाजिक न्याय व बदलती शिक्षण पध्दती’ या विषयावर महाचर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे, विद्रोही कविसंमेलन व प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी अखेरच्या दिवशी माजी मंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून योगेश देशमुख यांचा ‘तुमच्यासाठी कायपण’ हा समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.
अण्णा भाऊ साठे कलारत्न पुरस्कार शाहीर नामदेव वैरागर यांना जाहीर
अण्णा भाऊंच्या नावाने दिला जाणारा कलारत्न पुरस्कार लोककलावंत शाहीर नामदेव वैरागर यांना तर प्रल्हाद सुधारे व भाऊसाहेब अडागळे यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
First published on: 31-07-2013 at 02:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna bhau sathe kalaratna reward to shahir vairagar