श्रीकर परदेशी यांच्यासारख्या चांगल्या अधिकाऱयाची बदली करणाऱया राज्यकर्त्यांविरोधात जनतेने आदोलन करावे आणि त्यांना धडा शिकवावा, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी पुण्यात व्यक्त केले.
हजारे पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना परदेशी यांच्या बदलीवर प्रश्न विचारल्यावर अण्णा म्हणाले, चांगल्या अधिकाऱयांची बदली का केली जाते, याचा जनतेने विचार केला पाहिजे आणि त्याविरोधात आंदोलन केले पाहिजे. जे राज्यकर्ते चांगल्या अधिकाऱयांची बदली करतात. त्यांना मत देऊ नका.
आपण सगळेच परदेशी..!
गेल्या आठवड्यात राज्य सरकारने पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांची बदली करण्याचे आदेश दिले. परदेशी यांची मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागात महानिरीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे. परदेशी यांच्या बदलीचा पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक संघटना आणि नागरिकांनी जोरदार विरोध केला. बदलीविरोधात गेल्या शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये धरणे आंदोलनही करण्यात आले. परदेशी यांच्या जागेवर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांची बदली करण्यात आली आहे.
पिंपरीच्या आयुक्तपदासाठी कौटुंबिक ‘मैत्री’चा हात 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा