महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतींचा जागर जगभरात होणार आहे. ‘आशय सांस्कृतिक’च्यावतीने ‘पु. ल. परिवारा’च्या सहयोगाने आयोजित ‘ग्लोबल पुलोत्सव’ अंतर्गत देशातील तेवीस शहरांसह पाच खंडातील प्रमुख शहरांमध्ये वर्षभर विविध कार्यक्रम रंगणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘राजकीय पक्षांनी नेत्यांसाठी आचारसंहिता तयार करावी’; चंद्रकांत पाटील यांची सूचना

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि ‘ग्लोबल पुलोत्सवा’चे निमंत्रक चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, सहसंयोजक सुवर्णा भांबुरकर आणि नयनीश देशपांडे उपस्थित होते.

हेही वाचा- ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, निर्मात्यांच्या अडचणींमध्ये वाढ? अनेक संस्थांनी पाठवल्या नोटीसा

पाटील म्हणाले, ८ नोव्हेंबर २०२२ ते ८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ‘ग्लोबल पुलोत्सव’ जगभरात साजरा होणार आहे. राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, चंद्रपूर, नागपूर या शहरांसह देशातील इंदूर, बडोदा, बेंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, अहमदाबाद या शहरांमध्ये महोत्सवाचे कार्यक्रम होणार आहेत. तसेच, जगभरातील लंडन, म्युनिच, दुबई, सिंगापूर, मॉरिशस, कतार, सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरान्टो, जोहान्सबर्ग, सिडनी, ऑकलंड आदी शहरांमध्येही महोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्ताने प्रत्येक शहरात मान्यवरांची ‘सल्लागार समिती’ तर पु. ल. प्रेमी आणि संस्थांची ‘कार्य समिती’ तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती चित्राव यांनी दिली.

हेही वाचा- “अडीच वर्षात कधी मातोश्री बाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी टीका करणं बंद करावं” ; नारायण राणेंचा टोला

कार्यक्रमाची रुपरेखा

  • विविधरंगी कार्यक्रमांमधून स्थानिक कलाकारांना संधी
  • कलाकार आणि साहित्यिक अशा सुमारे एक हजार जणांचा सहभाग
  • प्रत्येक शहरातील पुलोत्सवात ‘स्मृती सन्मान’, ‘जीवनगौरव सन्मान’, ‘कृतज्ञता सन्मान’ व ‘तरुणाई सन्मान’
  • महोत्सवाच्या निमित्ताने पुलंवरील दर्जेदार पुस्तक आणि लघुपटाची निर्मिती
  • महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांनी पुलंच्या साहित्यावर चितारलेल्या अर्कचित्रांचे प्रदर्शन
  • ‘आय लव्ह पी. एल.’ या शीर्षकाखाली शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विशेष मोहीम
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Announcement of the global pulosthav festival which celebrates the memory of bridges all over the world throughout the year pune print news dpj
Show comments