पुणे : आगामी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ २३ एप्रिल रोजी पुण्यामध्ये निश्चित होणार आहे. सातारा, औदुंबर, अंमळनेर आणि जालना या निमंत्रण आलेल्या चार स्थळांना साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती भेट देणार असून, २३ एप्रिल रोजी पुण्यामध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये संमेलन स्थळाची घोषणा करण्यात येणार आहे.

महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रगल्भ झालेल्या वर्धा येथील संमेलनाला जेमतेम ८० दिवस झाले असले तरी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला आता आगामी ९७ व्या साहित्य संमेलनाचे वेध लागले आहे. आगामी संमेलनासाठी सातारा, औदुंबर, अंमळनेर आणि जालना अशा चार ठिकाणांहून निमंत्रणे साहित्य महामंडळाकडे प्राप्त झाली आहेत. साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात या स्थळांना भेट देऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर २३ एप्रिल रोजी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद येथे होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत स्थळ निवड समितीच्या अहवालावर चर्चा होऊन आगामी संमेलन स्थळाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्याने दिली.

Credai MCHI organized 32nd Property fair at jio World Center in bkc
बीकेसीत आजपासून तीन दिवसीय मालमत्ता प्रदर्शन, एकाच ठिकाणी घरखेरदीचे पर्याय उपलब्ध होणार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
zilla parishad loksatta
राज्यातील सहा जिल्हा परिषद, ४४ पंचायत समितींवर ‘प्रशासक राज’; मुदतवाढ नाहीच
Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; महायुतीच्या आमदारांशी साधणार संवाद
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan news in marathi
साहित्याच्या मांडवात राजकारण्यांची ‘सरबराई’!
Maharera , Registration , New Housing Project,
स्वयंविनियामक संस्थेतील प्रतिनिधींची आता दोन वर्षांसाठीच नियुक्ती, दोन वर्षांनंतर प्रतिनिधी बदलावे लागणार
ncp leader ajit pawar launch connect with people initiative
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा जनता संवाद उपक्रम; आठवड्यातील तीन दिवस मंत्री पक्षाच्या मुख्यालयात
Maharashtra Sadan not available for Sahitya Sammelan Delay for four months on fee issue Nagpur news
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मिळेना! शुल्काच्या मुद्द्यावर चार महिन्यांपासून खल

हेही वाचा – नवउद्यमींकडून कर्मचारी कपातीचे सत्र; मंदीच्या सावटामुळे देशभरात २३ हजार जणांनी  नोकऱ्या गमावल्या

हेही वाचा – पाच नवी कारागृहे बांधण्याचा प्रस्ताव; राज्यातील ६० तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी

दोनच वर्षांपूर्वी म्हणजे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठवाड्यातील उदगीर येथे झाले होते. त्यामुळे जालना या स्थळाचा विचार होण्याची शक्यता कमी दिसते. सातारा येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहुपुरी शाखा, औदुंबर येथील औदुंबर साहित्य मंडळ आणि अंमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळ या तीन स्थळांपैकी एकाचा विचार होईल, याकडे साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्याने लक्ष वेधले.

Story img Loader