राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत पुण्यामध्ये होणार आहे. स. प. महाविद्यालय परिसरात होणाऱ्या या बैठकीस सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्यासह रा.स्व. संघाचे पाच सहसरकार्यवाह आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> स्वातंत्र्यदिनाला लाल किल्ल्यावर हजेरी, तोतया लष्करी अधिकाऱ्याला पुणे रेल्वे स्थानकावर अटक

अखिल भारतीय पातळीवरची ही व्यापक समन्वय बैठक वर्षातून एकदा आयोजित होते. हा बहुमान यंदा पुण्याला मिळाला आहे. या बैठकीत संघप्रेरित राष्ट्र सेविका समिति, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पक्ष, भारतीय किसान संघ, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ, संस्कार भारती, सेवा भारती, संस्कृत भारती, अखिल भारतीय साहित्य परिषद अशा ३६ संघटना सहभागी होतील. गेल्या वर्षी ही बैठक छत्तीसगडमधील रायपूर येथे आयोजित करण्यात आली होती. तीन दिवसीय बैठकीत सहभागी होणाऱ्या सर्व संघटना समाजजीवनातील विविध पैलूंबाबत त्यांचे अनुभव आणि कार्य याबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत. सध्याच्या राष्ट्रीय परिस्थितीसोबतच सामाजिक समरसता, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सेवा कार्य, सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षा या विविध विषयांवर विस्तृत चर्चा होणार आहे. सामाजिकपरिवर्तनाच्या विविध क्षेत्रांमध्ये करावयाच्या कार्यांबाबतही बैठकीत चर्चा केली जाईल, अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Annual all india coordination meeting of rss will be held in pune from 14th to 16th september pune print news vvk 10 zws