पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलानजिक वडगाव उड्डाणपुलाजवळ भरधाव ट्रकने दहा वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. सुदैवाने अपघातात कोणी जखमी झाले नाही. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली.

दिलीप हरिष सिंह (वय २७, रा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून मुंबईकडे ट्रक निघाला होता. सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलानजिक वडगाव पुलाजवळ उतारावर ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि एकापाठोपाठ दहा वाहनांना धडक दिली. अपघातात ग्रामीण पोलिसांची गाडी, एक टेम्पो, आठ मोटारींचे नुकसान झाले.

one terrorist killed in jammu
जम्मूत एक दहशतवादी ठार, लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार; सुरक्षा दलाचे जोरदार प्रत्युत्तर
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Two children were injured in pune Narhe due to sudden explosion while bursting firecrackers
गटारावर फटाके फोडताना स्फोट झाल्याने दोन मुले जखमी, सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागातील घटना
police registered two cases over bomb rumors on plane pune
विमानात बाँम्बची अफवा; पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल, अफवा पसरविण्याचे प्रकार वाढीस
Drunk driver hits police constable incident in Kalyaninagar area
मद्यपी वाहनचालकाकडून पोलीस शिपायाला धक्काबुक्की, कल्याणीनगर भागातील घटना
Shalimar express
नागपूर: शालिमार एक्स्प्रेस रुळावरून घसरली, प्रवासी जखमी
Police fired on sandalwood thieves
विधी महाविद्यालय रस्त्यावर चंदन चोरट्यांकडून पोलिसांवर हल्ला, पोलिसांकडून गोळीबार
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
खेड शिवापूर टोलनाका परिसरात मोटारीतून कोट्यवधी रुपये जप्त

हेही वाचा – उमेदवार राहिला बाजूला, स्वतःच्याच पक्षाचा केला प्रचार, पोटनिवडणुकीतील खमंग चर्चा, वाचा कुठे झालं हे….

ग्रामीण पोलिसांची गाडी पाषाण येथील मुख्यालयात निघाली होती. अपघातानंतर ट्रकचालक पसार होण्याच्या तयारीत होता. नागरिकांनी पकडून त्याला चोप देण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण पोलिसांच्या गाडीतील पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले.

सिंहगड रस्ता पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. अपघातानंतर वडगाव पूल परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी क्रेनच्या सहायाने बाजूला काढली. सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे, वारजे वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार, उपनिरीक्षक मुकेश कुरेवाड यांनी या भगातील वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडल्याचे ट्रकचालकाने पोलिसांना सांगितले. अपघातात कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी दिली.

हेही वाचा – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नपेढी उपलब्ध

बाह्यवळण मार्गावर अपघातांचे सत्र कायम

मुुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना केल्या. उपाययोजनांनंतर बाह्यवळण मार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. चार दिवसांपूर्वी नऱ्हे भागातील नवले पुलाजवळ ट्रकने चार वाहनांना धडक दिली होती. अपघातात दोघेजण जखमी झाले होते.