पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला आणखी एक अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि दोन पोलीस उपायुक्त मिळणार आहेत. ही तीन पदे निर्माण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी-चिंचवडसाठी २०१८ मध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली. पिंपरी आणि ग्रामीण हद्दीतील पोलीस ठाण्याचे एकत्रित करत आयुक्तालय करण्यात आले. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १८ पोलीस ठाणे आहेत. एक अतिरिक्त आयुक्त आणि तीन पोलीस उपायुक्तांची पदे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी तीन पदे निर्माण करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वेगाने होणारे शहरीकरण, औद्योगीकीकरण, वाढत्या वाहन संख्येमुळे दुर्घटना, गुन्हेगारीतील वाढ यामुळे कामाची व्याप्ती वाढलेली असल्याने शासनाने एक अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि दोन पोलीस उपआयुक्त पदे निर्माण करण्यास मान्यता दिली. त्यानुसार आता ही पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच केली जाणार आहे.

शहराची वाढती लोकसंख्या पाहता तीन पदे निर्माण करण्याबाबत शासनाला पत्र पाठविले होते. शासनाने पद निर्मितीस मान्यता दिली आहे. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.-विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another additional commissioner of police for pimpri chinchwad pune print news ggy 03 ysh
Show comments