लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी महंत रामगिरींविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शोएब इस्माइल शेख (वय ६२, रा. घोरपडे पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महंत रामगिरी महाराज (रा. सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान, सरला बेट, ता. श्रीरामपूर, जि. नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आणखी वाचा-MPSC च्या विद्यार्थ्यांची मागणी सरकार मान्य करणार? देवेंद्र फडणवीसांनी दिलं ‘हे’ आश्वासन
महंत रामगिरी यांनी समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने भावना दुखाविल्या, तसेच त्यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहचली, असे शेख यांनी फिर्याद म्हटले आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार तपास करत आहेत.
दरम्यान, महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नाशिकमध्ये तणाव निर्माण झाला होता. दोन गटात दगडफेक झाल्याची घटना नुकतीच घडली होती.