पुणे : जामीनदाराची बनावट स्वाक्षरी करून ७७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय जोशी, त्यांचा मुलगा आणि पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय त्र्यंबक जोशी (वय ६५), त्यांचा मुलगा मयुरेश (वय ४६, दोघे रा. पानमळा, सिंहगड रस्ता), निनाद नागरी पतसंस्थेचे कोषाध्यक्ष रामलिंग शिवगणे आणि सचिव अशोक कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तानाजी दिनकर मोरे (वय ४२, रा. तुकाईनगर, वडगाव बुद्रुक) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

उदय जोशी आणि त्यांचा मुलगा मयुरेश यांची गॅस एजन्सी आहे. गॅस एजन्सीत पैसे गुंतविल्यास चांगला परतावा देण्यच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वी जोशी यांच्यासह मुलाविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. मयुरेशने सदाशिव पेठेतील निनाद नागरी पतसंस्थेतून कर्ज घेतले होते.

हेही वाचा : शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपींवर मोक्का कारवाई; मुख्य सूत्रधार गणेश मारणेचा शोध सुरूच

तक्रारदार ताानाजी मोरे यांना कर्जप्रकरणाची कोणतीही माहिती न देता कर्जप्रकरणावर त्यांची बनावट स्वाक्षरी केली. पतसंस्थेतील पदाधिकारी उदय जाेशी, रामलिंग शिवगणे, अशोक कुलकर्णी, तसेच संचालक मंडळातील अन्य संचालकाशी संगनमत करून ७७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. कर्जप्रकरणाची माहिती मोरे यांना न देता फसवणूक केली, तसेत कर्जाची परतफेड केली नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another fir against ex bjp corporator along with son in fraud case pune print news rbk 25 pbs
Show comments