आळंदीमध्ये वारकरी लाठीमार प्रकरण ताजे असतांना आता या ठिकाणचा आणखी व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पोलीसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असतांनाही काही तरुण वारकरी हे नियम डावलून पोलिसांना धक्काबुक्की करत, मागे ढकलत आणि त्यानंतर पोलीसांना तुडवत मंदिराच्या दिशेने धावत असल्याचं पाहायला मिळत आहे. रविवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्तानावेळी मंदिराच्या बाहेर पोलीस आणि तरुण वारकरी समोरासमोर आले होते त्यांच्यात झटापट झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… आळंदी: चार वारकऱ्यांना एकांतात २० पोलिसांनी मारहाण केली?; मारहाण झालेल्या वारकऱ्याचा आरोप!

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/06/WhatsApp-Video-2023-06-12-at-12.48.20.mp4
व्हायरल व्हिडीओ

संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या समोर काही तरुण मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना अडवताना पोलिसांनी सौम्य लाठीमार केला होता. मात्र तो लाठीमार झालेला नाही, किरकोळ झटापट झाल्याचा खुलासा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केला होता. तर विरोधी पक्षांनी या घटनेवरुन राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. असं असतांना रविवारचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे या सर्व वादाला आणखी वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another video from alandi is came out warkari trampled the police kjp 91 asj