गरजेपोटी घेतलेल्या पाच लाखांच्या कर्जाचा हप्ता चुकला म्हणून दररोज १५ हजार रुपयांच्या दंडाची मागणी आणि त्यासाठी दमदाटी करणाऱ्या सावकाराविरुद्ध लष्कर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली आहे.
हेही वाचा >>>पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
प्रसाद किसन कुतळ (वय ४५, रा. जेधे पार्क, रास्ता पेठ) असे गुन्हा दाखल केलेल्या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी एका दुग्ध व्यावसायिकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीुनुसार, फिर्यादी यांचा दुग्ध व्यवसाय आहे. गरजेपोटी त्यांनी प्रसाद कुतळ याच्याकडे पाच लाख रुपये मागितले. त्याने फिर्यादी यांना बँकेत बोलावले आणि दरमहा १० टक्के दराने पाच लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. पहिल्या दोन महिन्यांच्या व्याजाची एक लाखांची रक्कम रोख स्वरूपात घेतली. त्यानंतरच त्यांच्या खात्यावर पाच लाख रुपये जमा केले.
हेही वाचा >>>पुणे: बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी: तोतया पत्रकार अटकेत
फिर्यादी यांनी कुतळ यांना ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात एकूण ५ लाख ९५ हजार रुपयांची रक्कम दिली. तरीही व्याजाचा हप्ता चुकल्याचे सांगून कुतळ याने प्रत्येक दिवसाला १५ हजार रुपये दंड, असे एकूण १८ लाख १० हजार रुपयांची फिर्यादीकडे मागणी केली. त्यासाठी फिर्यादीच्या घरी येऊन शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यामुळे फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेऊन खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली होती. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव यांनी ही कारावाई केली.