पुणे : राजस्थानातून अफू विक्रीसाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने खराडी परिसरात पकडले. त्याच्याकडून दोन लाख २२ हजार रुपयांची अफू, वजनकाटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विजयसिंग खिमासिंग राजपुरोहित (वय ३७, रा. क्रांतीपार्क, खराडी, मूळ ऱा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

हेही वाचा >>> भादलवाडीत चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग

ravet Pm Awas Yojana news in marathi
पिंपरी : रावेतमधील आवास योजनेतील लाभार्थ्यांना किवळेत सदनिका; ‘या’ तारखेपर्यंत संमतीपत्र देण्याचे आवाहन
ugc recognized research papers
‘यूजीसी केअर’ रद्द करण्याचा निर्णय… काय होणार परिणाम?
prisoners e meet with family news in marathi
राज्यातील तीन लाख कैद्यांचा ‘ई-मुलाखती’द्वारे कुटुंबीयांशी संवाद, ११०० परदेशी कैद्यांना दिलासा
transgenders pune police
पुणे : तृतीयपंथीयांसाठी पोलीस ठाण्यात कक्ष
dr girish kulkarni loksatta
समविचारी सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे, डॉ. गिरीश कुलकर्णी यांचे मत
Dubai Sugar Conference a beacon for the global sugar industry Harshvardhan Patil
दुबई साखर परिषद जागतिक साखर उद्योगासाठी दिशादर्शक; हर्षवर्धन पाटील
Tanaji Sawant Son Rushiraj Sawant
Tanaji Sawant Son : ऋषीराज सावंत खासगी विमानाने बँकॉकला का जात होता? काय घडलं होतं? बंधू गिरीराज सावंतांनी सांगितली मोठी माहिती
no alt text set
पुणे जिल्ह्यातील जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे, ४३८ कोटींच्या खर्चास मान्यता
Land acquisition will be done for the reserved land of Mahatma Phule Wada Memorial pune news
महात्मा फुले वाडा स्मारकाच्या आरक्षित जागेचे होणार भूसंपादन ! महात्मा फुले वाडा- सावित्रीबाई फुले स्मारकाचा होणार विस्तार

अमली पदार्थ विरोधी पथक खराडी भागात गस्त घालत होते. त्यावेळी संत तुकारामनगर भागातील एका दुकानाजवळ राजपुराेहित थांबला असून, त्याच्याकडे अफू असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा पिशवीत दोन लाख २२ हजार रुपयांची १११ ग्रॅम अफू, वजनकाटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, संदीप शिर्के, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, संदेश काकडे यांनी ही कारवाई केली.

Story img Loader