पुणे : राजस्थानातून अफू विक्रीसाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने खराडी परिसरात पकडले. त्याच्याकडून दोन लाख २२ हजार रुपयांची अफू, वजनकाटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विजयसिंग खिमासिंग राजपुरोहित (वय ३७, रा. क्रांतीपार्क, खराडी, मूळ ऱा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> भादलवाडीत चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग

अमली पदार्थ विरोधी पथक खराडी भागात गस्त घालत होते. त्यावेळी संत तुकारामनगर भागातील एका दुकानाजवळ राजपुराेहित थांबला असून, त्याच्याकडे अफू असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा पिशवीत दोन लाख २२ हजार रुपयांची १११ ग्रॅम अफू, वजनकाटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, संदीप शिर्के, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, संदेश काकडे यांनी ही कारवाई केली.