पिंपरी- चिंचवडमध्ये गांजा विक्री करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. हरीश मगन सोनवणे अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सहा लाखांचा १० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हरीश सोनवणे हा उच्चशिक्षित आहे. तो पिंपरी- चिंचवड मध्ये कंत्राट पद्धतीवर नोकरी करतो. त्याचा भाऊ देखील उच्चशिक्षित असून स्पोर्ट टीचर आहे. पैशांच्या हव्यासापोटी हरीश सोनवणे ने गांजा विक्री करत होता.
हरीश सोनवणे च मूळ गाव हे मध्यप्रदेशच्या बॉण्ड्री वर असलेल्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर गाव आहे. मध्यप्रदेश मधून त्याने गांजा आणला असल्याचा अंदाज पोलिसांना आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे सौदागर परिसरातील प्रथम वाईनच्या समोर उभा राहून तो गांजा विक्री करण्याचा प्रयत्न करत होता. दुचाकी वरील बसलेल्या हरीश च्या पाठीवर सॅग आणि पुढे ट्रॅव्हल बॅग मध्ये दहा किलो गांजा होता. याबाबतची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी विजय दौंडकर आणि कलाटे यांना मिळाली.
पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम तयार करण्यात आली. तात्काळ घटनास्थळी पोहचले. पिंपळे सौदागर मधील प्रथम वाईनच्या समोर हरीश सोनवणे हा दुचाकी वर बसलेला असताना त्याला ताब्यात घेतलं. त्याची पंचासमोर झडती घेण्यात आली. त्याच्या बॅगेमध्ये दहा किलो गांजा आढळला आहे. हा गांजा मध्यप्रदेशातून आणला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात हरीश सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड यांच्या टीम ने केली आहे.