पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कारवाई तीव्र करण्यात आली आहे. त्याअंतर्गत मार्केटयार्ड आणि वाघोली परिसरात कारवाई करून एकूण एक हजार ५० किलो प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून जप्त करण्यात आले. तसेच ५५ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.
हेही वाचा >>>मिळकतकर थकबाकीदारांच्या विरोधात मोहीम; पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ११ मिळकती सील
अविघनटशील कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असल्याने प्लास्टिक आणि थर्माकोलचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यासंदर्भात राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने अधिसूचना पारित केली असून अधिसूचनेची कार्यवाही करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्यानुसार महापालिकेकडून ही मोहिम हाती घेण्यात आली आहे.
हेही वाचा >>>पुणे : हिंदी मालिकांमध्ये काम देण्याच्या आमिषाने तरुणीची ७१ हजारांची फसवणूक
महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभागाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मार्केटयार्डातील फुलबाजारात आणि वाघोली परिसरात दंडात्मक कारवाई केली. मार्केटयार्ड परिसरातून ४५० प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर पाच कारवाईतून दाखल करण्यात आले. त्यातून पंचवीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला. वाघोली परिसरात चार कारवाईतून तीस हजार रुपये दंड वसूल करताना ६०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
हेही वाचा >>>पिंपरीः भोसरीत दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; मुख्याध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उप आयुक्त आशा राऊत, केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अतिरिक्त संचालक शशीकांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनाशाकील वैज्ञानिक सहाय्यक विशाल भंडारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी संदीप पाटील, महापालिकेचे प्रमुख आरोग्य निरीक्षक इमामुद्दीन इनामदार, आरोग्य निरीक्षक राजेस रासकर, उमेश देवकर यांनी ही कारवाई केली.