ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. वि. वि. (अप्पासाहेब) पेंडसे यांच्या जन्मशताब्दी वर्षांमधील कार्यक्रमांना सुरुवात होत असून अप्पासाहेब पेंडसे जन्मशताब्दी समितीतर्फे शनिवारी (१९ डिसेंबर) ‘भारत-२०५०, विश्वसत्ता’ या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
शिवदर्शन चौक, पर्वती येथील मुक्तांगण इंग्लिश स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशनचे संचालक डॉ. विवेक सावंत, गोखले इन्स्टिटय़ूटचे संचालक डॉ. राजस परचुरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण अभ्यास विभागाचे डॉ. श्रीकांत परांजपे हे सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट परिसंवादाचा समारोप करणार आहेत. परिसंवादाचा प्रारंभ शनिवारी सायंकाळी सहा वाजता होईल.
जन्मशताब्दी समितीतर्फे रविवारी (२० डिसेंबर) सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत डॉ. अप्पा पेंडसे अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यवर्ती पुणे आणि ज्ञान प्रबोधिनी परिसराभोवतीची एक प्रतीकात्मक फेरी असे या पदयात्रेचे स्वरूप असेल. प्रबोधिनीचे आजी-माजी विद्यार्थी, कार्यकर्ते, हितचिंतक, अप्पांचे इतर परिचित या फेरीत सहभागी होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा