वकिलांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या (दि.११) पुणे जिल्ह्य़ातील वकिलांनी कामकाजात सहभागी होऊ नये, असे आवाहन पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र उमाप यांनी केले आहे.
जयपूर आणि चंडीगढ येथे वकिलांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बार कौन्सिल ऑफ इंडियाने देशातील वकिलांनी उद्या कामकाजात सहभागी होऊ नये, असे आवाहन केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य हर्षद निंबाळकर आणि महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या शिस्त पालन कमिटीचे सदस्य अॅड. बिपीन पाटोळे यांनीही राज्यातील वकील या हल्ल्याच्या निषेधार्थ कामकाज बंद ठेवणार असल्याचे सांगितले. सर्व वकिलांनी शांततापूर्ण आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वकिलांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करावा, असे आवाहन अॅड. उमाप यांनी केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा