पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत उपायुक्त म्हणून आस्थापनेवर असलेले अभिजित बापट हे सातारा नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून कामकाज करत आहेत. उपायुक्त असलेल्या बापट यांच्याकडे सातारा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार शासनाने दिला आहे. त्यामुळे आस्थापना पिंपरीत आणि कामकाज साताऱ्यात करत असल्याचे समोर आले. दरम्यान, साताऱ्यातील भाजपा राज्यसभा खासदाराच्या आग्रहावरुन बापट यांना साताऱ्यात ठेवले असल्याची प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे.
सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी असलेले अभिजीत बापट यांना शासनाने १८ जून २०२१ रोजी मुख्याधिकारी ‘गट अ’ (एस २०) वरुन मुख्याधिकारी ‘गट अ’ (एस २३) म्हणून पदोन्नती दिली. बापट यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तपदी प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली. बापट यांना साताऱ्याच्या जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी प्रतिनियुक्तीच्या पदावर पिंपरीत रुजू होण्यासाठी १२ जुलै २०२१ रोजी कार्यमुक्त केले. त्यानुसार तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी अभिजीत बापट यांना १२ जुलै २०२१ रोजी महापालिकेच्या उपायुक्तपदी रुजू करुन घेतले. बापट हे रुजू होण्यासाठी एक दिवस महापालिकेत आले. त्यानंतर पालिकेत फिरकले नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा