मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू असून त्याअंतर्गत अतिरिक्त ७५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात कर आकारणी आणि कर संकलन विभागाला दिलेले उद्दिष्ट साध्य केले जाईल, असा दावा कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला समाजमाध्यमांचे वावडे ; अधिकृत खाते सुरू करण्याकडे दुर्लक्षच

महापालिकेच्या उत्पन्नाचा मिळकतकर हा प्रमुख स्रोत आहे. गेल्या आर्थिक वर्षात महापालिकेला मिळकतकरातून मोठे उत्पन्न मिळाले आहे. मिळकतकरातून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना सुरू आहेत. कर आकारणी न झालेल्या मिळकतींनाही कर कक्षेत आणण्यात येत असून थकबाकी वसुलीलाही प्राधान्य देण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण

चालू आर्थिक वर्षात मिळकतकर विभागाला २ हजार २०० कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सध्या मिळकतकरातून १ हजार ३०० कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. यापुढील काळात मिळकतकर थकबाकी वसुलीला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी या विभागासाठी अतिरिक्त कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला आहे. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी तसे परिपत्रक काढले आहे.

Story img Loader