पुणे : पुणे पोलीस आयुक्तयालायात नव्याने सुरू झालेल्या सात पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शनिवारी दिले. सात नवीन पोलीस ठाण्यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे शहराचा विस्तार वाढत आहे. गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याने शहरात नवीन पोलीस ठाणे, तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा करण्यात आला होता. गृहविभागाने पुणे पोलीस आयुक्तालयात सात नवीन पोलीस ठाणी सुरु करण्यास मंजुरी दिली, तसेच पोलीस ठाण्यात काम करण्यासाठी ८२६ पोलीस कर्मचारी उपलब्ध करून दिले. पोलीस ठाण्यांच्या इमारत उभारणीसाठी ६० कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यानुसार आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी ही नवीन पोलीस ठाणे सुरू झाली. पोलीस ठाण्यांसाठी जागाही निश्चित करण्यात आली.

हेही वाचा – आव्वाज कुणाचा?

हेही वाचा – पुणे : जनता वसाहतीत टोळक्याकडून वाहनांची तोडफोड; दोघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात सुरु करण्यात आलेल्या नवीन सात पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. नियुक्त करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे – शरद झिने, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंबेगाव पोलीस ठाणे), अतुल भोस, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक नांदेड सिटी), महेश बोळकोटगी, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाणेर पोलीस ठाणे), विजयानंद पाटील, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतु:शृंगी पोलीस ठाणे), संजय चव्हाण, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडी पोलीस ठाणे), अनिल माने (वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस ठाणे), पंडीत रेजीतवाड, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस ठाणे), सर्जेराव कुंभार, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस ठाणे), मंगल मोढवे , (वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुरसुंगी पोलीस ठाणे), शंकर साळुंखे, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस ठाणे), मानसिंग पाटील, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस ठाणे)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appointment of senior police inspectors in seven new police stations pune print news rbk 25 ssb