लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : देशभरात दहशतवादी कारवाया कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना कोथरुड परिसरात दुचाकी चोरताना पुणे पोलिसांनी पकडले. दहा लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यात आल्यानंतर पुणे, मुंबईसह देशभरातील महत्वाच्या शहरात घातपाती कारवाया करण्याचा डाव उधळला गेला. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) महासंचालक दिनकर गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि परिमंडळ तीनचे उपायुक्त सुहेल शर्मा यांचे कौतुक केले आहे. याबाबत त्यांनी पुणे पोलिसांना अभिनंदन पत्रही दिले आहे.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

कोथरूड पोलिसांनी दुचाकी चोरताना तिघांना पकडले होते. त्यांची घरझडती घेण्यासाठी कोंढव्यात गेले असताना साथीदार मोहम्मद शाहनवाज आलम पसार झाला होता. युसूफ खान आणि महम्मद युनूस साकी या दोघांकडे चौकशी केल्यावर त्यांना एनआयएने फरार घोषित केल्याचे समजले. त्यांना पकडण्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर एनआयएने या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. पुणे, मुंबईसह देशातील विविध शहरात असलेल्या आयसिस या दहशतवादी संघटनेकडून दहशतवादी विचारधारेचा प्रसार करण्यात येत असून, तरुणांना भडकाविण्याचे काम केले आत असल्याचे तपासात उघडकीस आले. पुण्यातील डॉ. अदनान सरकार दहशतवादी विचारधारेचा प्रसार करण्यात सामील असल्याचे उघड झाले. डॉ. सरकारसह साथीदारांना अटक करण्यात आली.

आणखी वाचा-जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर अजित पवार गटाचे वर्चस्व; बारामती तालुक्यातील दोन ग्रामपंचायती भाजपकडे

पुणे पोलिसांच्या तत्परतेमुळे दहशतवादी कारवायांचा डाव उधळला गेल्याने एनआयएचे पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी कौतुक केले आहे. पुणे पोलिसांच्या प्रशंसनीय कामगिरीमुळे दहशतवादी कारवाया रोखणे शक्य झाले असल्याचे गुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे.

Story img Loader