शहरातील रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी १५ कोटींच्या खर्चाला महापालिकेने मान्यता दिली आहे. शहराचे प्रवेशद्वार असलेले १२ रस्ते अतिमहत्त्वाचे म्हणून निश्चित केले आहेत. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्ती आणि सुशोभीकरणावर दरवर्षी मोठा खर्च केला जातो. त्यापैकी दुभाजक दुरुस्त, पेंटींंग थर्मोप्लास्टिक पेंट, साइन बोर्ड, कब्र स्टोन, पेडस्ट्रीयन क्रॉसिंग या कामासाठी निविदा मान्य करण्यात आली आहे. या बारा रस्त्यांपैकी नेहरू रस्ता, खंडुजीबाबा चौक ते पौड फाटा, खडीमशीन चौक ते येवलेवाडी, शंकरशेठ रस्ता, नगर रस्ता, स्वारगेट ते कात्रज-सातारा रस्ता, बिबवेवाडी मुख्य रस्ता, बावधन मुख्य रस्ता या रस्त्यांच्या कामांसाठी प्रशासनाकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याला आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी मान्यता दिली. उर्वरित रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती महापालिकेच्या पथ विभागाकडून देण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा