लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: महापालिका प्रशासनाकडून विविध खासगी आणि शासकीय कंपन्यांना सेवा वाहिन्या टाकण्यासाठी परवानगी दिल्याने यंदाही पावसाळ्यात रस्ते खोदाई सुरू राहण्याची शक्यता आहे. महापालिकेने एकूण ३२८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या खोदाईच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे रस्तेखोदाई मेअखेरपर्यंत सुरूच राहणार असून, यंदाही भर पावसाळ्यात रस्ते पूर्ववत करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाला करावी लागण्याची शक्यता असल्याने नागरिक आणि वाहनचालकांना यंदाही गैरसोईला आणि त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
The murder of a minor girl will be tried in a fast track court thane news
अल्पवयीन मुलीचे हत्याप्रकरण जलदगती न्यायालयात चालणार
thane police
कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी

पावसाळा संपल्यानंतर महापालिकेच्या पथ विभागाकडून रस्ते खोदाईला परवानगी दिली जाते. विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी खासगी कंपन्यांबरोबरच शासकीय कंपन्यांचे प्रस्ताव मंजूर केले जातात. महापालिकेच्या पाणीपुरवठा, पथ विभाग, मलनिस्सारण विभागाबरोबरच क्षेत्रीय कार्यालयांकडून विविध कामे केली जातात. त्यानुसार ३१ मार्च २०२३ पर्यंत एकूण ३२८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या खोदाईला मान्यता देण्यात आली आहे. ही कामे अद्यापही सुरूच आहेत. त्याशिवाय समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत नव्याने जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्तेखोदाई शहराच्या काही भागात सुरू आहे.

आणखी वाचा- पुणे विभागात ४५०० दुकानात इंटरनेट सेवा

महापालिकेच्या नियमानुसार १५ मेपर्यंत रस्तेखोदाईची कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र अद्यापही बहुतांश ठिकाणची कामे बाकी आहेत. त्यामुळे ही कामे पूर्ण करण्यासाठी दर वर्षीप्रमाणे मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेअखेरपर्यंत रस्तेखोदाई सुरूच राहण्याची शक्यता आहे. रस्तेखोदाईची कामे पूर्ण झाल्यानंतरच महापालिका प्रशासनाकडून रस्ते पूर्ववत करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. तोपर्यंत पावसाळा सुरू होण्याची शक्यता असल्याने गतवर्षीप्रमाणे यंदाही भर पावसाळ्यातच रस्ते डांबरीकरण, पूर्ववत करण्यात येणार आहेत. पावसाळ्याच्या कालावधीत रस्त्यांची डागडुजी करण्यात येणार असल्याने या पद्धतीची कामे अशास्त्रीय पद्धतीने होण्याची आणि त्यावर केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जाण्याची भीती आहे. कामांच्या गुणवत्तेवरही त्याचा परिणाम होणार असल्याने यंदाही पावसाळ्यात वाहनचालक आणि नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

रस्तेखोदाईसाठी मार्गदर्शक सूचना

भूमिगत सेवावाहिन्या टाकताना चुकीच्या पद्धतीने रस्तेखोदाई होते. त्यामुळे महापालिकेच्या पथ विभागाने रस्तेखोदाईसाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. कामाचा लॅट लाँग करून रस्त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूस करावयाचे काम दर्शवून प्रस्ताव सादर करण्यात यावा. उपअभियंत्यांनी जागा पाहणी करून सेवा वाहिन्यांची मार्गिका निश्चित करावी. रस्ता दोष दायित्व कालावधीतील (डिफेक्ट लायबिलिटी पिरिअड) असेल, तर रस्तेखोदाईला परवानगी देण्यात येऊ नये. ट्रेचिंग धोरणानुसार वाहतूक विभागाची परवानगी घ्यावी, असे पथ विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय तांत्रिक पद्धतीचे काही निकषही निश्चित करण्यात आले आहेत.

पंधरा मेनंतर रस्तेखोदाईला परवानगी दिली जाणार नाही. रस्तेखोदाईनंतर ते पूर्ववत करण्याची प्रक्रिया तातडीने हाती घेण्यात येईल. तशी सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्यात येतील. पावसाळ्याच्या कालावधीत नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. -व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभागप्रमुख, पुणे महापालिका

Story img Loader