लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : डेक्कन येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुतळ्यावर महापालिकेच्या वतीने मेघडंबरी उभारण्यात येणार आहे. तसेच येथील स्मारक व गरवारे भुयारी मार्गाच्या परिसराचे सुशोभीकरण देखील केले जाणार आहे. यासाठी ४७ लाख २७ हजार रुपयांच्या निविदेला नुकतीच स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Murder of son who became obstacle in immoral relationship women and her boyfriend arrested
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाचा खून, आईसह प्रियकर अटकेत
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Jammu & Kashmir Election Results 2024
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 : जम्मू-काश्मीरची सत्ता मिळवली, कलम ३७० बाबत आता कोणती भूमिका? ओमर अब्दुल्ला म्हणाले…
ratan tata dinner with workers
जेव्हा रतन टाटा पिंपरीतील कामगारांसोबत जेवण करतात…ताटही स्वतः उचलून ठेवतात…
Noel Tata New Chairman of Tata Trust Latest News
टाटा ट्रस्टला मिळाले नवे चेअरमन! रतन टाटांनंतर कुटुंबातील ‘या’ सदस्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी
Jayant Patil
Maharashtra News: महाविकास आघाडीचं जागावाटप ‘या’ तारखेला होणार जाहीर; जयंत पाटलांची मोठी घोषणा!
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर संपवले, तुझ्याबरोबरही तेच करू…”, सलीम खान यांनी कोणाला दिली होती ही धमकी?
Govinda Hospitalized after Shooting Himself Accidently
अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून लागली गोळी, पत्नीने दिली प्रकृतीबद्दल माहिती

डेक्कन परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा आहे. या संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर मेघडंबरी उभारण्यात यावी, तसेच येथील परिसराचे सुशोभीकरण केले जावे, अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. वेगवेगळ्या सामाजिक संघटनांकडून ही मागणी होत होती. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी भवन विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता वीरेंद्र केळकर व अन्य अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जागेवर पाहाणी केली होती. यानंतर पालिकेच्या भवन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला होता.

आणखी वाचा-अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाचा खून, आईसह प्रियकर अटकेत

याअंतर्गत छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या भोवती बांधकामामध्ये चौथरा उभारण्यात येणार आहे. त्यावर पॉलिस्टर रेझिनचा वापर करून आकर्षक मेघडंबरी उभारण्यात येणार आहे. तसेच अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना उभे राहता यावे, यासाठीदेखील नव्याने चौथरा तयार करण्यात येणार आहे. या चौथऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या उभारल्या जातील. तसेच दगडी बांधकामामध्ये सुशोभीकरण केले जाईल. यासाठी भवन विभागामार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

पूर्वगणन रकमेपेक्षा साडेपाच टक्के कमी दराने आलेल्या सर्वांत कमी दराच्या निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या कामात मेघडंबरीसह, जिने व चौथऱ्याच्या कामाचा समावेश आहे. कार्यादेश निघाल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण केले जाईल, असे कार्यकारी अभियंता वीरेंद्र केळकर यांनी सांगितले.

आणखी वाचा-जन्म-मृत्यू दाखले विलंबाबाबत पुणे महापालिकेने दिली महत्वाची माहिती!

ही मेघडंबरी व्हावी, यासाठी विश्व हिंदू मराठा संघाचे भूषण वरपे यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता. डेक्कन जिमखाना परिसरात असलेल्या धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून विविध उपक्रमांची सुरुवात होत असते. विविध राजकीय पक्षांचे नेते या भागात आल्यानंतर या ठिकाणी येऊन संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला भेट देत पुष्पहार अर्पण करत असतात. संभाजी महाराजांच्या या पूर्णाकृती पुतळ्यापासूनच मराठा समाजाचे ‘एक मराठा – लाख मराठा ‘ हे आंदोलन सुरू झाले होते. अनेक मोर्चे, आंदोलनाची सुरुवात येथून होत असते. त्यामुळे या पुतळ्याच्या आजूबाजूच्या परिसरात सुशोभीकरण करावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात होती.