लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठीच्या ‘एमएचटी-सीईटी’ या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या अर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा राज्य सीईटी सेलने उपलब्ध करून दिली आहे. अर्जात दुरुस्ती करण्यासाठी २५ एप्रिलची मुदत आहे.

राज्य सीईटी सेलमार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार ‘एमएचटी-सीईटी’ या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज आणि शुल्क भरून विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यापैकी काही विद्यार्थ्यांकडून अर्ज करताना अनावधनाने विविध प्रकारच्या चुका झालेल्या असून, त्या चुकांच्या दुरुस्तीची संधी मिळण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे.

हेही वाचा… पुणे: पीएमआरडीएच्या दिमतीला अद्ययावत ड्रोन

त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या अर्जात बदल करण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, लिंग आणि स्वाक्षरी यात बदल करता येईल. बदल करण्यासाठी २५ एप्रिलची मुदत देण्यात आल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: April 25 is the deadline for correction in mht cet application in pune pune print news ccp 14 dvr
Show comments