लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून १६ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी एपीएस वेल्थ व्हेंन्चर्सच्या संचालकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘४६ कोटींची बिलं, अवैध राखेचे साठे, एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० हायवा’, सुरेश धस यांचे गंभीर आरोप
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Chhota Rajan gang. session court. Pre-arrest bail ,
विकासकाकडून दहा कोटींची खंडणी मागण्याचे प्रकरण : छोटा राजन टोळीच्या दोघांना सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन
ED seized property in bank fraud case
२२० कोटींच्या फसवणूक प्रकरणी ईडीकडून ७९ कोटींची मालमत्तेवर टाच
Explosion at an ordnance manufacturing factory in Jawahar Nagar
भंडाऱ्यातील घटनेमुळे देशभरातील आयुध निर्माणीतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे का?
property tax defaulters in pune news in marathi
अभय योजनेचा फायदा घेणारेच झाले पुन्हा थकबाकीदार, नक्की प्रकार काय ?
maharashtra lost over rs 1085 crore to cyber scams in last three month
तीन महिन्यांत १०८५ कोटींची सायबर फसवणूक
Police team arrests thief who tried to steal mobile phone at Thane railway station thane news
ठाणे रेल्वे स्थानकात ८० हजार रुपयांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न; चोरट्याला पोलीस पथकाने केली अटक

याबाबत डॉ. जयदीप शंकरराव जाधव (वय ५० रा. कस्पटे वस्ती रस्ता, वाकड) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी या कंपनीचे संचालक अविनाश अर्जुन राठोड, त्याची पत्नी विशाखा अविनाश राठोड (रा. आनंदबन सोसायटी, रावेत) यांच्यासह अन्य संचालकांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा… लोणावळा: मंकी हिलच्या दरीत पाय घसरुन पडला… झाडाच्या फांदीत अडकल्याने बचावला!

आरोपींनी डाॅ. जाधव यांना एपीएस वेल्थ व्हेंन्चर्स एलएलपी या कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. डाॅ. जाधव यांनी ८६ लाख रुपये आणि त्यांच्या नातेवाईकांनी १५ कोटी ४५ लाख रुपयांची गुंतवणूक आरोपींनी सांगितलेल्या वेगवेगळ्या योजनेत केली होती. आरोपींनी जादा परताव्याचे आमिष दाखवून करार करुन घेतला होता. आरोपींनी परतावा न देता फिर्यादी डाॅ. जाधव यांच्यासह गुंतवणुकदारांची सुमारे १६ कोटी रुपयांची फसवणूक केली. आरोपींनी अशा प्रकारे शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक केली असून फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

Story img Loader